छेड काढणाऱ्या मजनुस महिलेने चपलेने बदडले; औरंगाबाद रेल्वेस्थानकावरील घटना

Foto

औरंगाबाद रेल्वेस्थंकावर महिलेला अश्लील शेरेबाजी करीत पाठलागकरून धक्का मारनाऱ्या मजनुस महिलेने चपलेचा प्रसाद दिला आहे.  यानंतर नागरिकांनी त्या तरुणास पकडून पोलोसांच्या स्वाधीन केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री औरंगाबाद रेल्वेस्थंकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर घडली. हा सर्व प्रकार  तेथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

लासुर भागात चालत्या रेल्वे मध्ये एका तरुणीची काही तरुणांनी छेड काढल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेला आठवडा ही उलटत नाही तर पुन्हा औरंगाबाद रेल्वेस्थंकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर थांबलेल्या एका महिलेची  छेड काढण्यात आली. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान एक महिला इतर गावासाठी रेल्वेची वाट पाहत थांबली असता तेथे आलेल्या एका तरुणाने महिलेला  अश्लील शेरेबाजी करण्यास सुरुवात केली. तेथून महिलेने बाजूस जाणे पसंत केले. मात्र, तरुणाने पाठलाग करून त्या महिलेला जोराचा धक्का मारला. यावरून महिलेचा  राग अनावर झाला व महिलेने पायातील चप्पल काढत त्या मजनुस चंगला चोप दिला. हा प्रकार पाहून नागरिकांनी त्या तरुणास पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, महिलेने तक्रार देण्यास नकार दिल्याने शेवटी पोलिसांनी त्या तरुणास सोडून दिले हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.